Gosikhurd Flood | गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले; 10036.61 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Batmi Express

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live 2024,Gosikhurd Flood Live,Bhandara Gosikhurd Dam

  

Gosikhurd Flood Live Updates,Gadchiroli,Bramhapuri,Goshikhurd,Gosikhurd,Bhandara,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2023,Bhandara Gosikhurd Dam,Gosikhurd News,Bhandara News,

भंडारा: गोसीखुर्द (Bhandara Gosikhurd Dam धरणाचे 33 पैकी 33 गेट 1 मीटरणे उघडण्यात आले असून 10036.61 क्युमेक्स (354439 Cusec) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संजय सरोवर जलाशय (भीमगड) धरणाच्या पाणीसाठा क्षेत्रात पावसामुळे पाण्याची आवक होत आहे, त्यामुळे विहित पाणी पातळी राखण्यासाठी आज दिनांक 22/07/2024 रोजी दुपारी 12:00 वा. धरणाचे पाण्याचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे 35,000 घनफूट प्रति सेकंद (991 cumecs) पाण्याचं विसर्ग केलं जाईल.

गोसीखुर्द धरणाचे  पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आवश्यकते नुसार टप्प्याटप्प्याने 10036.61 क्युमेक्स पर्यंत विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीपात्रात आवागमन करू नये व नदीकाठावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी बाळगावी व सतर्क राहावे. संबंधित प्रशासन यंत्रणेने दक्ष राहावे व आपल्या स्तरावरून संबंधितास तसे अवगत करावे, ही विनंती.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.