कोरची. कोरची तालुक्यात काल सायंकाळी ७ च्या सुमारास गारपीटीसह वादळी पाऊस पडला. त्यामुळे उन्हाळी पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बऱ्याच गावात गारांसह वादळी पाऊस पडला. यात शेतातील धानाच्या लोंबीतील धान्य झडले.हाती आलेले पीक हाताबाहेर गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Korchi News)
कर्ज,उधार उसने करून बरेच शेतकरी शेतात पीक घेत आहेत.परंतु अवेळी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील चार ते पाच वर्षापासून शेतकरी कोरची तालुक्यात उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. भाताचे पीक कापणीला पण आले आहे. परंतु मागील पंधरा दिवसापासून अधुनमधून पाउस पडतो आहे.त्यामुळे धान्याची कापनी केली नाही. तरीही काही शेतऱ्यांनी पीकाची कापणी केली, त्यापैकी काही शेतकऱ्यांनी शेतावरच धान्य वाळू टाकले आहेत. असे वाळू टाकलेले धान्य अचानक झालेल्या पाण्यात भिजले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांचे धान्य कापणीला आले आहेत, ते धान्य पाण्यात बुडाल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
ज्या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला आहे अशा शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.