गडचिरोली: तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने केले ठार | Batmi Express

Be
0
Gadchiroli,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli Today,Gadchiroli News,Gadchiroli News IN Marathi,

गडचिरोली : तीन महिलांसोबत तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने झडप घालून हल्ला केला. यात महिला जागीच ठार झाली. सदर घटना गडचिरोली तालुक्यातील सावरगाव जंगल परिसरात आज मंगळवार सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली. 

महिनीनुसार, पार्वता बालाजी पाल (६५) रा. आंबेशिवणी ता. गडचिरोली असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पार्वता ही तीन महिलांसोबत आंबेशिवणीजवळची कठाणी नदी ओलांडून  तेंदूपाने संकलनासाठी गेली होती. गावापासून जवळपास ४ कि.मी. हे अंतर आहे. तेंदूपाने संकलनाच्या कामात व्यस्त असतानाच झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पार्वता यांच्यावर हल्ला केला व फरफटत घनदाट जंगलाच्या दिशेने नेले. 

दरम्यान महिला किंचाळल्या व त्यांनी आरडाओरड केली. तेव्हा परिसरात तेंदूपाने गोळा करणारे मजूर गोळा झाले. तोपर्यंत वाघ १०० ते १२५ मीटर अंतर पार्वताबाईला फरफटत घेऊन गेला. काही वेळाने बरेच मजूर गोळा झाले व आरडाओरड केल्याने वाघ घटनास्थळावरून पसार झाला. परंतु तोपर्यंत पार्वता गतप्राण झाली. काही वेळाने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर चातगाव वनपरिक्षेत्रात येतो. 

पार्वताबाई यांच्या मुलाचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून सून व नातू वेगळे राहत होते तर पार्वता ही पती बालाजी पाल यांच्यासोबत राहत होती. त्यांच्यापश्चात पती, विवाहित मुलगी, सून व नातवंडे आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->