तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur Accident: कार-दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार | Batmi Express

Chandrapur,Chimur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Today,Chandrapur Live,

Chandrapur,Chimur,Chandrapur News,Chandrapur Accident,Chandrapur Today,Chandrapur Live,

चंद्रपूर :- चिमूर-कांम्पा महामार्गावरील शंकरपूर जवळील डोमा फाट्यावर कार व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. सदरची घटना दिनांक - 13मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. श्रावण बापूराव गुरनुले (वय 40वर्षे ) असे मृत पतीचे नाव आहे.

श्रावण गुरनुले हे चिमुर तालुक्यातील डोमा येथील रहिवासी आहेत. ते 13मे रोजी आपल्या पत्नी कल्पना यांच्यासोबत लावारी जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. तेंदूपत्ता घेऊन गावी परत येत असताना चिमूर-कान्पा मार्गावरील डोमा फाट्यावर शंकरपूरकडे जाणाऱ्या कारची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात श्रावण गुरूनुले यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी दुचाकीने लगेच पेट घेतला. व दुचाकी काही क्षणात जळून खाक झाली. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या तेंदूपत्ता मजुरांनी कल्पना यांना जखमी अवस्थेत शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. तेथून त्यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच श्रावण गुरनुले यांचा मृतदेह चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघातानंतर पोलिसांनी कारचालकाला शंकरपूर येथील बस स्थानकाजवळ अडवून कार जप्त केली. व त्याच्यावर गुन्हा दाखल केला.


Chandrapur :- A terrible accident took place between a car and a two-wheeler at the Doma fork near Shankarpur on the Chimur-Kampa highway. In this accident, the husband of the two-wheeler died on the spot while the wife was seriously injured. The said incident took place on May 13 at around 12 noon. The deceased husband's name is Shravan Bapurao Gurnule (aged 40 years).

Shravan Gurnule is a resident of Doma in Chimur taluka. On May 13, he along with his wife Kalpana had gone on a two-wheeler to cut tendrils in Lavari forest. While returning to the village with Tendupatta, a car heading towards Shankarpur collided with his bike at the Doma fork on the Chimur-Kanpa road. Shravan Gurunule died on the spot in this accident. The accident was so terrible that the bike immediately caught fire at the spot. And the bike got burnt in a few moments. Then the Tendupatta laborers who were with him shifted Kalpana to the primary health center in Shankarpur in an injured condition. From there he was admitted to the Upazila Hospital in Chimur. Also, the body of Shravan Gurnule was sent to the Upazila Hospital in Chimur. After the accident, the police stopped the driver near the bus station in Shankarpur and seized the car. And filed a case against him.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.