Farmer Suicide: शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या... | Batmi Express

Bhandara Suicide,Bhandara,Bhandara Live,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Crime,

Bhandara Suicide,Bhandara,Bhandara Live,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Crime,

भंडारा :- 
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मेंढा-पोहरा येथील शेतकऱ्याने सततची नापिकी आणि बँकेच्या व उसनवारीच्या कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Farmer Suicideकेल्याची धक्कादायक घटना आज घडली. मृत शेतकऱ्याचे नाव प्रदीप रामचंद्र दोनाडकर वय 45 वर्ष असे आहे. सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. 

शेतकरी प्रदीप दोनाडकर हे कर्जबाजारी पणाला कंटाळले होते.शेतीसाठी लागणारा लागत खर्च जास्त तर उत्पादन कमी; त्यामुळे बँक व इतर हात उसनवारी घेतलेली रक्कम परतफेड कशी करायची? अशातच कधी किडीचा प्रादुर्भाव तर कधी अवकाळी पाऊस व इतर समस्यांचे डोंगर त्यांना नेहमी भेडसावत असल्याने दोनाडकर यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.सदर घडलेली घटना गावात तसेच परिसरात वाऱ्यासारखी पसरली.घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच; पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.