Action! शैक्षणिक कारणासाठी लागणारे दाखले काढून घेण्याचे आवाहन | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,

 

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,

Ø अतिरिक्त पैसे आकारल्यास करा तक्रार

चंद्रपूर, दि. 30 : जून महिन्यात इयत्ता 10 वी व 12 वीच्या निकालानंतर पुढील प्रवेश प्रक्रियेकरीता विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी होते. त्यामुळे ब-याच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शैक्षणिक कारणासाठी लागणारे विविध दाखले त्वरीत काढून घेण्याचे आवाहन चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे. तसेच ठराविक दरापेक्षा अतिरिक्त दर आकारल्यास लेखी तक्रार करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

निकालापुर्वीच मे महिन्यात पुढील प्रवेशाकरीता गरजेचे शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी जवळच्या सेतु केंद्रात, आपले सरकार केंद्र किंवा ग्रामपंचायतीच्या महासंग्राम सेवा केंद्रात अर्ज करावे. महसूल प्रशासनामार्फत शैक्षणिक प्रवेशाकरीता प्रामुख्याने खालील प्रमाणे विविध दाखले निर्गमीत करण्यात येतात.

आवश्यक दस्ताऐवज व शुल्क : 

जातीच्या प्रमाणपत्रासाठी अनुसूचित जाती जमाती – 1950 चा पुरावा, भटक्या जमाती – 1961 चा पुरावा, इतर मागासवर्गीय व विमुक्त जाती जमाती – 1967 चा पुरावा (शुल्क – 57.20 रुपये). नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राकरीता जातीचे प्रमाणपत्र, तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र (शुल्क – 57.20 रुपये). उत्पन्न प्रमाणपत्रासाठी 1 वर्षाकरीता तलाठ्याचे उत्पन्न प्रमाणपत्र, 3 वर्षाकरीता (नॉनक्रिमी) तलाठी यांचे उत्पन्न प्रमाणपत्र (शुल्क – 33.60 रुपये). रहिवासी दाखल्याकरीता 15 वर्षांचा महसुली पुरावा (शुल्क – 33.60 रुपये), ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राकरीता उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 1967 चा महाराष्ट्रातील पुरावा (शुल्क – 33.60 रुपये) आणि महिला आरक्षण प्रमाणपत्रासाठी उत्पन्न दाखला, परिशिष्ट 1 व 2, जातीचे प्रमाणपत्र (शुल्क – 33.60 रुपये). विहित प्रमाणपत्राकरीता सेतु चालकाने निर्धारीत प्रमाण शुल्कापेक्षा जास्त पैशाची मागणी केल्यास संबंधित सेतू चालक / मालकाच्या नावाची लेखी तक्रार तहसीलदार, चंद्रपूर यांच्याकडे द्यावी, असे आवाहन तहसीलदार विजय पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.