तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Naxal: गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Naxal Live,Naxal,Naxal Today,Naxal Updates,

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Naxal,Naxal Live,Naxal,Naxal Today,Naxal Updates,

गडचिरोली:- 
गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरील नक्षली कॅम्प उद्ध्वस्त करीत मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिसांनी ३० मार्चच्या सकाळी केली.

कसनसूर, चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पोलिस स्टेशन पेंढरीपासून १२ किमी पूर्वेला) तळ ठोकून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.


या माहितीच्या आधारे अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकाच्या जवानांद्वारे सदर जंगल परिसरात अभियान राबविण्यात आले. सदर अभियान पथक शनिवारी सकाळी ४५० मीटर उंच टेकडीवर पोहोचले. त्यावेळी नक्षलवादी नुकतेच सदर ठिकाणहून निघाले होते. डोंगरमाथ्यावरील ठिकाणावर शोध मोहीम राबविली असता त्याठिकाणी माओवाद्यांचे एक मोठे आश्रयस्थान आणि छावणी सापडली. ती अभियान पथकाद्वारे नष्ट करण्यात आली. सदर जंगल परिसरात पुढील शोध सुरू करण्यात आला. परंतु नक्षली घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.


घटनास्थळावरून कॉर्डेक्स वायर, डिटोनेटर्स, जिलेटिन स्टिक्स, बॅटऱ्या, वॉकी टॉकी चार्जर, बॅकपॅक आदी नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. सदर परिसरात नक्षल शोध अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.