Breaking! लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या | Batmi Express

Gondia,Gondia Crime,gondia news,Gondia Today,Molested,torture,Murder,Gondia Murdered,
Gondia,Gondia Crime,gondia news,Gondia Today,Molested,torture,Murder,Gondia Murdered,Deori,

गोंदिया:- 
कुटुंबासह गावातीलच लग्न समारंभात गेलेल्या १२ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमाने तिला दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला. सदर घटना १९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास देवरी तालुक्याच्या ककोडी परसिरातील वटेकसा येथील जंगलात घडली. काजल (१२) (बदललेले नाव) रा. गोठणपार असे मृत मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवरी तालुक्यातील गोठणपार येथे 19 एप्रिलला लग्नात अल्पवयीन मुलगी ही आपल्या पालकांसह उपस्थित होती. याचवेळी अंधाराचा फायदा घेऊन आरोपींनी तिचे अपहरण केले. गावाशेजारी असणाऱ्या जंगलात अत्याचार केला आणि चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या केली.

दरम्यान, लग्न कार्यात व्यस्त असलेल्या पालकांना जेव्हा मुलगी लग्नस्थळी आढळली नाही, तेव्हा तिच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, रात्री कुठेही तिचा पत्ता लागला नाही. गावकरी आणि इतर नातेवाइकांनी शेजारच्या गावातही मुलीचा शोध घेतला.

Read Also:


मात्र, त्याच फायदा झाला नाही. तथापि, शनिवारी (ता. 20) धवलखेडी गावातील गावकरी जंगलात मोहफुल वेचण्यासाठी गेले असता तिथे त्यांना मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी चिचगड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

तपासासाठी चमू रवाना -

या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी चिचगड येथील ठाणेदार काळेल व त्यांची चमू कामाला लागली आहे. प्रकरण तापू नये म्हणून आरोपींना अटक करण्यासाठी तपासाची सुत्रे पोलिसांनी चालविली आहेत.

दोषींना अटक करून फाशी द्या -

निरागस मुलीचे अपहरण करून तिच्यावर अमाणूस कृत्य करीत तिचा जीव घेणाऱ्या नराधमाला त्वरीत अटक करा, या प्रकरणातील दोषीला फाशी देण्यात यावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.

लोकशाहीच्या आनंदावर लगेच पडले विरजन -

लोकशाही मजबूत करण्यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान करण्यात आले. उमेद्वारांनी महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षेचे वचन देत मत मागितले. परंतु मतदानाचे कार्य होताच १२ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्याचे अमाणूस कृत्य करण्यात आले. या संतापजनक घटनेमुळे गोंदिया जिल्हा हादरला आहे. मुलीच्या सुरक्षेचा आणि संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.