⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: मतदान करणाऱ्यांना मिळणार आझाद बगीच्यात मोफत प्रवेश | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर (Chandrapur) :
 चंद्रपुर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या मतदानात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation) अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असुन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील, ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना १९ व २१० एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

१३ – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध प्रयत्न प्रशासनामार्फत केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून मतदार चिठ्ठी चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. या मतदार चिठ्ठीद्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.

Read More: 

या वाटपादरम्यान जर काही नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल तर त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करता येईल किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये, नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर ( Epic Number ) टाकून माहिती करून घेता येईल.

त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर जावून माहिती करून घेता येईल किंवा चंद्रपूर महानगरपालिकेच्या १८००१२३७९८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून मतदार चिठ्ठीबाबत माहिती घेता येईल. तेव्हा सर्व नागरिकांनी १९ एप्रिल रोजी मतदान करून जागरूक नागरिकाचा हक्क बजावण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.