⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर | आदर्श आचारसंहिता : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नये... | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

 Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

चंद्रपूर पोलिसांची करडी नजर

चंद्रपूर, दि. 15 : सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक - 2024 आदर्श आचारसंहिता सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षातील उमेदवार उभे असून प्रचार सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीया व्हॉट्सॲप,  फेसबुक, एक्स (ट्विटर) इत्यादी समाज माध्यमावर विविध प्रकारचे ऑडीओ/व्हिडीओ व इतर संदेश टाकण्यात येतात. तसेच अशा पोस्टवर इतर लोक लाईक व कॉमेन्टस् करून शेअर करतात. परंतु असे निदर्शनास आले आहे की, खोटया बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ/व्हिडीओ व संदेश सोशल मिडीयावर वायरल होत आहे.

तसेच काही इसम व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक द्वेषबुध्दीने वरोधी उमेदवारांच्या वैयक्तिक आणि कुटुंबियांना लक्ष करून द्विअर्थी आक्षेपार्ह पोस्ट टाकत आहेत व अशा पोस्टला इतर लोक लाईक व त्यावर आक्षेपार्ह कॉमेन्टस् करून शेअर करीत आहे. यावरून चंद्रपुरात नुकताच आदर्श आचारसंहिता दरम्यान समाज माध्यमावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग केल्याप्रकरणी संबंधित इसमा विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आलेली आहे.

तरी, आपण आपले व्हॉट्सॲप,  फेसबुक, एक्स (ट्विटर) व इतर सोशल मिडीयावर राजकीय पक्ष व उमेदवार बाबत वैयक्तिक व आक्षेपार्ह टिकाटिप्पणी तसेच धार्मिक भावना दुखविणा-या पोस्ट टाकू नये. कोणतेही व्हिडीओ, फोटो एडीट करून आक्षेपार्ह भासवून पोस्ट करु नये किंवा त्यास लाईक व कॉमेन्टस् करून अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करू नये. सोशल मीडिया व इंटरनेटच्या माध्यमातून पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवण्यात यावे. अन्यथा संबंधितांविरुध्द प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.

अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ/ऑडीओ संदेश प्राप्त झाल्यास त्या-त्या समाज माध्यमावर रिपोर्ट करावे. किंवा त्याची माहिती त्वरीत नजीकच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर पोलिस स्टेशन येथील 8888511911 या मोबाईल क्रमांकावर द्यावी. सोशल मिडीयावरील प्रत्येक पोस्ट वर चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचे बारकाईने लक्ष आहे, असे पोलिस दलाने कळविले आहे.


Chandrapur, Dt. 15: Currently, the Model Code of Conduct for the 2024 General Lok Sabha Elections is in effect. Various political party candidates are actively campaigning, utilizing platforms like WhatsApp, Facebook, and X (Twitter). However, there's a concerning trend of misinformation spreading through audio/video messages on social media.

Additionally, some activists and political groups are deliberately posting offensive content targeting opposing candidates and their families, leading to discord in society. A case has been filed against one such individual for disturbing peace with offensive social media posts during the Model Code of Conduct in Chandrapur.

It's important not to engage in posting personal attacks, offensive comments about political parties or candidates, or content that may offend religious sentiments on social media platforms. Editing videos or photos to spread offensive content is also unacceptable. Social media usage should be responsible, considering its impact on society. Violators will face legal consequences under existing laws.

If you encounter offensive audio/video messages, report them on respective social media platforms or contact the nearest police station or cyber police station at mobile number 8888511911. The Chandrapur district police force is closely monitoring social media activities for compliance with the law.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.