तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी पोहचले घरोघरी | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,

100 टक्के वाटप करण्याच्या सुचना

चंद्रपूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याची पडताडणी केली.

13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याबाबत नागरिकांना विचारून खात्री केली. यावेळी त्यांनी देवई गोविंदपूर येथील मतदान केंद्र क्रमांक 74, 75 आणि 42 या मतदान यादीतील समाविष्ट भागाला भेट दिली. तसेच शहरातील शास्त्रीनगर, बागला चौक या भागाला सुध्दा भेटी दिल्या.

Read More: 


यावेळी त्यांनी मतदार चिठ्ठ्या वाटपाची प्रगती, तसेच शिल्लक असलेल्या मतदार चिठ्ठ्या याबाबत संबंधित केंद्रस्तरीय अधिका-यांकडून सविस्तर आढावा घेतला. मतदार चिठ्ठ्या वाटपाचे काम वेळेत 100 टक्के पूर्ण होईल, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.  ज्या क्षेत्रात मतदार चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते.

याप्रसंगी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूर मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले यांच्यासह पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.



Chandrapur: As the Lok Sabha general election fervor intensifies, with only five days remaining until voting day, the district administration is actively engaging citizens to enhance voter turnout. District Election Officer and Collector Vinay Gowda G.C. personally visited citizens' homes on Sunday to verify their receipt of voter slips.

The Chandrapur Lok Sabha constituency election is scheduled for the first phase on April 19, 2024, from 7 am to 6 pm. With the aim of boosting voter participation, the administration is conducting door-to-door distribution of 'voter slips'. District Collector Vinay Gowda visited residences in the Chandrapur Assembly Constituency to ensure citizens have received their voter slips. He visited polling stations number 74, 75, and 42 in Dewai Govindpur, along with areas such as Shastri Nagar and Bagla Chowk in the city.

During the visit, he meticulously reviewed the progress of voter slip distribution, emphasizing the importance of completing the task promptly. Distributing voter slips is expected to positively impact voter turnout in the respective areas. Citizens expressed confidence as their names appear on the voter list.

Present at the occasion were Municipal Commissioner Vipin Paliwal, Assistant Election Officer and Sub Divisional Officer of Chandrapur Constituency Sanjay Pawar, Tehsildar Vijay Pawar, Additional Commissioner Mangesh Khawle, as well as supervisors and officials from polling centers.



टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.