कांकेर, दि. 16 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या दरम्यान नक्षली डोके वर काढतांना दिसत आहे. अशातच आज 16 एप्रिल ला पोलीस नक्षल चकमकीत तब्बल 18 नक्षली ठार झाल्याची माहिती पुढे येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील कांकेरच्या छोटेबेठिया ठाण्याअंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षल्यांसोबत चकमक उडाली. सुमारे एक तास चाललेल्या या चकमकीत तब्बल 18 नक्षली ठार तर 3 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. चकमकीनंतर घटनस्थळावरून Ak47 व इतर स्वयंचलित हत्यार जप्त करण्यात आले आहे. आता पर्यंतची ही मोठी कारवाई मानल्या जात आहे. तसेच ठार नक्षल्यांचा आकडाही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Note- News Is Updating.