आरमोरी: हातावरची मेहंदी पुसण्याआधी विवाहितेने संपविले जीवन | Batmi express

Armori,Armori News,Armori Crime,Armori Live,Gadchiroli,Gadchiroli Crime,Gadchiroli News,Armori Suicide,

Armori,Armori News,Armori Crime,Armori Live,Gadchiroli,Gadchiroli Crime,Gadchiroli News,Armori Suicide,

आरमोरी: लग्नानंतर अकराव्या दिवशीच विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिवणी (बुज) येथे मंगळवारी घडली. मोनाली जगदीश ढोरे (वय २२ वर्षे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

शिवणी येथील जगदीश ढोरे यांचा विवाह भंडारा जिल्ह्यातील गौराळायेथील मोनाली संजय शहारे हिच्याशी ५ एप्रिलला झाला होता. शिवणी येथे जगदीशच्याच घरी दोघांनी आप्त स्वकियांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. विवाह समारंभ आटोपल्यानंतर मोनाली ही माहेरवरून सासरी शिवणी येथे नांदायला आली.

सुखी संसाराचे स्वप्न रंगवून दोघांनीही आपल्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. मात्र, १६ रोजी पहाटे मोनाली हिने घरातील आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण कळू शकले नाही.

आरमोरी पोलिसांनी पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.