Big News! मोबाइलवरून मुलासोबत बोलल्याने भावाकडून बहिणीची हत्या | Batmi Express

Be
0

Jivati,Chandrapur,Chandrapur Crime,Chandrapur News,Chandrapur Murder,Chandrapur Live,Chandrapur Today,

जिवती:- मोबाइलवरून एका मुलाशी बोलल्याचे पाहून शेणगावातील मोठ्या भावाने बहिणीच्या डोक्यावर काठीने प्रहार केल्याने गंभीर जखमी झालेल्या बहिणीचा उपचारादरम्यान शुक्रवारी चंद्रपुरात खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. सुजाता कावरे (१९) असे मृत युवतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी रमेश कावरे (२३) याला अटक केली आहे.

तालुक्यातील शेणगाव येथे रमेश परवतम व रंजिता परवतम हे पती-पत्नी मुलांसह रवी तेलंग यांच्या घरी भाड्याने राहतात. त्या घरी २४ मार्चला सिरोंचा येथील मावसबहीण रजिता प्रसाद मुडमडगेला ही आली होती. त्यावेळी रजिता व रमेश परवतम, रंजिताची बहीण सुजाता कावरे, रमेश कावरे व त्याचा मित्र चंदन हे घरी होते. मात्र, रमेश परवतमचे भोपाळ येथे काम असल्याने त्या दिवशी रात्री ९ वाजता रंजिता व रमेश परवतम हे मुलांसह भोपाळला निघून गेले.

२७ मार्चला दुपारी २ वाजेदरम्यान आरोपी भाऊ रमेश कावरे याच्या फोनवर बहीण सुजाता मुलाशी बोलत असल्याच्या कारणावरून भावा-बहिणीत वाद झाला. दरम्यान, रंजिताने जाऊन बघितले असता रमेशने तिला खोलीत जायला सांगितले. त्यामुळे रंजिता निघून गेल्यानंतर सुजाताच्या ओरडण्याचा मोठा आवाज आला. बहीण-भावाचे आपसी भांडण असल्याने रंजिताने दुर्लक्ष केले; परंतु काही वेळाने खोलीत बघितल्यानंतर सुजाता ही रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. तिच्या अंगावर चादर टाकण्यात आली. खोलीतच एक काठीही आढळली.

पाहुणी म्हणून आलेल्या रंजिताला सुजाताची गंभीर स्थिती बघून प्रचंड धक्का बसला. दरम्यान, रमेश कावरे हा घरून निघून गेला. काही वेळातच रमेशचा मित्र चंदन घरी आल्यानंतर दोघांनी भाजीपाला विकण्याच्या मालवाहू गाडीने सुजाताला गडचांदूर येथे उपचारासाठी नेले होते. काही वेळातच आरोपी रमेश हा त्या ठिकाणी आला व त्याने एक काळीपिवळी गाडी भाड्याने केली.


त्यानंतर २७ मार्चला दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास चंद्रपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांना अपघात झाल्याचे खोटे कारण सांगण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री ११:३० वाजता तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी चंद्रपुरातील रामनगर पोलिसांनी बयाण नोंदवून गुन्हा दाखल केला होता. मात्र, घटनास्थळ जिवती तालुक्यातील असल्याने हे प्रकरण जिवती पोलिसांकडे सोपविण्यात आले जिवती पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->