Education: बीसीए, बीएमएस, बीबीएच्या प्रवेशासाठी सीईटी केले जाणार | Batmi Express

Education,Education News,CET,CET Exam,CET 2024,BCA,BMS,BBA,BBM,
Education,Education News,CET,CET Exam,CET 2024,BCA,BMS,BBA,BBM,

मुंबई (Mumbai): बीसीए, बीएमएस, बीबीए, बीबीएम या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे प्रवेश सामाईक प्रवेश परीक्षे मार्फत (सीईटी) केले जाणार आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या संदर्भात सूचना प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगा ने (यूजीसी) केलेल्या सूचनेनुसार उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून राज्याच्या सीईटी सेलकडे सीईटी घेण्याबाबत विचारणा केली होती.

राज्य सरकारच्या प्रस्तावानुसार सीईटी सेलने महा.बी.बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम सीईटी, २०२४ ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व बाहेरील परीक्षा केंद्रांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सीईटीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी २१ मार्च ते ११ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. सीईटीचा अभ्यासक्रम आणि माहिती पुस्तिका सीईटी सेलच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.