Student Suicide: 'स्वारी' लिहून परीक्षेच्या पूर्वसंध्येला 'अनिशा'ची आत्महत्या | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur Live,suicide,Student Suicide,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur Live,suicide,Student Suicide,

चंद्रपूर:-
 नोटबुकाच्या शेवटच्या पानावर 'स्वारी' लिहून बारावीच्या विद्यार्थिनीने परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच आपल्या आजोबाच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दि.२० फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुमित्रानगर तुकुम येथे उघडकीस आली. (Student Suicide)


अनिशा खरतड (१९) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अनिशाचे वडील चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयात वायरलेस विभागात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.


मंगळवारी ती दररोजसारखी अभ्यास करायला आजोबांच्या फ्लॅटमध्ये गेली होती. मात्र, बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही. त्यामुळे तिचे आई-वडील त्याठिकाणी गेले. त्यांना दरवाजा उघडा दिसला. त्यांनी रुममध्ये जाऊन बघितल्याबरोबर अनिशा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. हे दृश्य बघून दोघांनीही मोठा हंबरडा फोडला. याबाबतची माहिती दुर्गापूर पोलिस स्टेशनला देण्यात आली.

दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव, दुर्गापूरच्या पोलिस निरीक्षक लता वाडीवे आपल्या चमूसह दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करताना नोटबुकच्या शेवटच्या पानावर 'स्वारी' लिहिल्याचे दिसून आले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. पुढील तपास दुर्गापूर पोलिस करत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.