Murder-Suicide: पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीची आत्महत्या | Batmi Express

Gondpipari,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur Murder,Chandrapur Live,Gondpipari Suicide,Suicide,

Gondpipari,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur Murder,Chandrapur Live,Gondpipari Suicide,Suicide,

गोंडपिपरी:-
 मध्यरात्री झोपेत असलेल्या पत्नीवर कुन्हाडीने वार करीत शनिवारी रात्री हत्या केल्यानंतर आरोपी पती पसार झाला होता. पोलिस त्याच्या मागावर असतानाच रविवारी वेडगाव परिसरातील जंगलालगत असलेल्या बंधाऱ्यात पतीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. पत्नीच्या हत्येनंतर पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीच्या हत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथील दामोधर धुडसे याने त्याची पत्नी लता धुडसे हिची (१६ फेब्रुवारी) रोजी झोपेतच हत्या केली होती. हत्येची थरारक घटना कळताच गावात एकच खळबळ माजली होती, हत्येनंतर पती दामोधर धुडसे हा फरार होता. दरम्यान पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता, त्याचा मृतदेहच आढळला.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.