Suicide: पोलीस निरीक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या | Batmi Express

Nashik,Nashik Crime,Nashik Crime News,Nashik News,Suicide,Nashik Suicide

नाशिक:-
 अंबड पोलिस ठाण्यातच स्वतःच्या कॅबीनमध्ये मंगळवार (दि. २०) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४० ) यांनी स्वतःच्या पिस्तूल मधून डोक्यात गोळी मारून जीवन संपवून टाकले आहे.

पाळीसाठी कामावर हजर झाले होते. मात्र काही वेळातच त्यांनी त्यांच्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली.


गोळीचा आवाज येताच त्यांचे सहकारी त्यांच्या केबिनमध्ये गेले तेव्हा अजन यांचा मृतेदह खुर्चीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.