तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वाघ पुन्हा आला! वाघाच्या हल्ल्यात इसम ठार | Batmi Express

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Tiger Attack,Sindewahi,Sindewahi News,Bramhapuri,Bramhapuri News,
Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Tiger Attack,Sindewahi,Sindewahi News,Bramhapuri,Bramhapuri News,

सिंदेवाही :- ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील कच्चेपार बीट- २ दोन कक्ष क्रमांक २५४ मध्ये एका इसमाला आज १९ फेब्रुवारी सकाळी ८:३० वाजता च्या दरम्यान वाघाने हमला करून ठार केल्याची घटना घडली. मृतक श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार (५१ वर्ष) राहणार पळसगाव (जाट) असे मृतकाचे नाव आहे.

श्रीकृष्ण सदाशिव कोठेवार हा आपल्या नेहमीच्या काही सहकाऱ्यांसोबत जंगलातील कच्चेपार बीटा मध्ये नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास काड्या तोडायला गेला असता काड्या गोळा करताना चालत चालत जंगलामधील नाल्यालगत पाण्याजवळ बसलेल्या वाघाच्या अचानक समोर गेल्यामुळे वाघाने हमला करून श्रीकांत कोठेवार यावेळेस असलेल्या यास ठार केले. 


घटनास्थळाजवळ सहकाऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला हाकलण्याचा प्रयत्न केला मात्र वाघाने मृतदेह १०० मीटर पर्यंत उचलून नेला. तोपर्यंत श्रीकांत हा मृत पावलेला होता. सदर घटनेची माहिती वनविभागाला देताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक, के.डी. मसराम ही आपली चमू घेऊन घटनास्थळी दाखल झाले. 

यावेळेस चौधरी वनरक्षक कच्चेपार बिट, चहांदे वनरक्षक डोंगरगाव बीट, पंडित मेकेवार वनरक्षक आलेवाही, फुलझले वनरक्षक सिंदेवाही बिट, तोडसाम कारगाटा वनरक्षक, व स्वाब संस्थेचे जिवेश सयाम, शुभम निकेशर, आदी स्वाब संस्थेचे सदस्य हे यावेळी घटना स्थळी उपस्थित होऊन सिंदेवाही पोलिसांना घटनेची माहिती दिली व मोक्का पंचनामा करून पोलिसांनी सिंदेवाही येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात शव विच्छेदन करण्याकरिता आणण्यात आले. पीडित परिवाराला वन विभागातर्फ तात्काळ मदत म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले. कुटूंबाला उर्वरित रक्कम स्वरुपात २४ लाख ७५ हजार रुपये वनविभागातर्फे त्वरित देण्यात येईल असे आश्वासन वनाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.