Chandrapur Petrol-Diesel News: जिल्हयात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार नाही | Batmi Express

Chandrapur Petrol-Diesel News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Hit-And-Run Case,Hit-A

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Hit-And-Run Case,Hit-And-Run,

चंद्रपूर (Chandrapur) :
 मालवाहतुक करणाऱ्या चालकांच्या संपच्या अनुषंगाने जिल्हयात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आज २ जानेवारी, २०२४रोजी जिल्हयातील विविध ठिकाणातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे प्लॉन्ट मॅनेजर, डेपो मॅनेजर, कन्सुमर सेल्स मॅनेजर, डेपो प्रभारी अधिकारी, हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., पेट्रोल डिलर्स असोसिएशन अध्यक्ष, पेट्रोल-डिझेल पुरवठा करणारे टॉन्सपोटर्स, महाराज्य राज्य परिवहन मंडळचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाहतुक पोलीस निरीक्षक आणि चंद्रपूर उपविभागातील विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची बैठक आयोजित करुन सविस्तर चर्चा करण्यात आली असुन सदर बैठकीच्या चर्चे अंती जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सर्व जनतेला आव्हाण केले आहे की, जिल्हयात कुठेही पेट्रोल/डिझेलचा तुटवडा होणार नाही, त्यामुळे सर्व सामान्य जनतेनी कुठल्याही अफवांमुळे पॅनिक होऊ नये. (Chandrapur Petrol-Diesel News)

तसेच संपात सहभागी वाहतूकदारांना सुध्दा सुचना करण्यात येते की, त्यांनी संप / आंदोलन दरम्यान कायदा हातात घेवु नये अन्यथा त्यांचेविरुध्द परिणामकारक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहील व संपात सहभागी चालक/वाहतुकदार आंदोलकांकडून कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हयात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा. यासाठी आज 2 जानेवारी, 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत सुधीर नंदनवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर, पुरुषोत्तम व्यवहारे, डिव्हीजनल वाहतुक अधिकारी, राज्य परिवहन मंडळ, चंद्रपूर, राजेश मुळे, पोनि रामनगर, सतिशसिंह राजपुत पोनि चंद्रपूर शहर, शिवाजी कदम पोनि पडोली, रोशन यादव, पोनि वाहतुक शाखा, विजय राठोड पोनि जिविशा, मनोहर कोरेटी, पोनि सुरक्षा शाखा यांचे सह अंकित त्रिवेदी प्लॉट मॅनेजर HPCL LPG Bouling Plant, एम. राजीव Chief Depo Manger IOCL Depot, घनश्याम दरबार अध्यक्ष पेट्रोल डिलर्स असोसिऐशन, युवराज सिंग IOCL Consumer Sales, प्रज्जवल जोशी IOCI., शिबु IOCI. Tadali, जोहेब सिध्दीकी IOCL Chandrapur, शिवाजी आडे K.S.Transport, स्वामी समर्थ ट्रॉन्सपोर्ट HPCL, पंकजसिंग, साहिल पिदुरकर Vyanktesh Oil Agency असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अधिकारी, पेट्रोल डिलर्स असोसिएशन अध्यक्ष, विविध ट्रॉन्सपोटर्स चे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.