नियंत्रण सुटल्याने दुचाकीची पुलाच्या सुरक्षा कठड्याला जबर धडक, जावई व सासरे गंभीर घायाळ | Batmi Express

Chamorshi,Gadchiroli Accident,Accident,Gadchiroli,Chamorshi News,Chamorshi Accident,

Chamorshi,Gadchiroli Accident,Accident,Gadchiroli,Chamorshi News,Chamorshi Accident,

आष्टी:
चामोर्शी तालुक्यातील आष्टी - चामोर्शी मार्गांवरील उमरी जवळील पुलाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली या धडकेत दुचाकीस्वार जावयासह सासरा गंभीर घायाळ झाल्याची घटना दिनांक दोन जानेवारी मंगळवारी  चार वाजताच्या सुमारास घडली. संदिप तुळशीराम पोटे वय 42 वर्ष रा. मुरखळा ता. चामोर्शी  जिल्हा गडचिरोली परशूराम बालाजी ठाकूर वय 65 वर्ष रा. बल्लू ता. चामोर्शी असे गंभीर जखमीची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की मुरखळा येथील संदीप पोटे हा आपल्या सासरे परशूराम ठाकूर यांना घेउन दुचाकी क्रमांक MH 33 AB 0655 ने तेलंगणातील सिरपुर येथे शेतीची किटकनाशके खरेदी करण्यासाठी गेले तिथून गावाकडे परत जात असताना आष्टी चामोर्शी मार्गावरील उमरजवळील पुलाच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला दुचाकीची जबर धडक बसली ही धडक इतकी भीषण होती की यात दुचाकीस्वार जावई संदिप पोटे याचा एका पायाचा अर्धा तुकडाच पडला तर सासरे परशूराम ठाकूर यांचा एक पाय चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे  पोलीस उपनिरिक्षक गणेश जंगले हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व जखमीना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर  दोन्हीं जखमींना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.