गडचिरोली:- जाचक हिट ॲड रन कायदा रद्द करण्याचा मागणी करीता आंदोलनाचा दूसऱ्या दिवशी शिवसेना (उबाठा) प्रणीत वाहन चालक संघटना व जय संघर्ष वाहन चालक संघटनेचा वतीने आज मंगळवार रोजी वडसा -कूरखेडा मार्गावरील बायपास जवळ दिड तास चक्काजाम आंदोलन करीत काळा कायदा रद्द करण्याकरीता जोरदार नारेबाजी करण्यात आली.
हिट ॲन्ड रन कायद्यात अपघाताला जबाबदार वाहन चालकांच्या विरोधात १० वर्षाचा कारावास व ७ लाखांच्या दंडाची तरतूद आहे जेमतेम मिळकतीवर कूटूंबाचा उदरनिर्वाह करणारऱ्या गरीब वाहन चालकांचे कूटूंबच या कायद्याने उध्वस्त होण्याचा धोका असल्याने राष्ट्रव्यापी या कायद्याचा तिव्र विरोध होत आहे कुरखेडा तालूक्यातील वाहन चालक संघटना सूद्धा १ जानेवारी पासून आपले सर्व खाजगी प्रवासी मालवाहक वाहने बंद ठेवत आंदोलनात सहभागी झाले आहेत काल सोमवार रोजी तहसीलदार मार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले होते तर आज येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले दरम्यान आंदोलन स्थळी पोहचत ठाणेदार संदीप पाटील यानी आंदोलकांशी चर्चा करीत त्यांचा भावना शासनाकडे पोहचविण्याचे आश्वासन देत समजूत काढली व रस्ता मोकळा केला आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल तालूका प्रमुख आशिष काळे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे तालूका अध्यक्ष भारत गावळ सचिव जावेद शेख उपाध्यक्ष शाम थोटे सचीन पंडित, कैलाश उईके, आशिष हिळको, अनिल ठाकरे, एजाज शेख,हेमंत घोगरे, छगन मडावी,रोशन वालदे,प्रीतम वालदे बजरंग बैस हेमंत चंदनखेडे ओमकार निमजे रेहान पठान जाफर पठान मोईन खान, जयचंद सहारे, नासीर शेख, ताहीर शेख,इंन्द्रजीत ताराम, चिंतामन सहारे,दिपक मेश्राम,प्रदिप मानकर, प्रकाश कूमरे,प्रमोद मेश्राम, विनोद होळी,जयंत निमजे, लंकेश नंदनवार,राजू टेभूंर्णे, विलास कूमरे,राजू नागपूरे,लक्ष्मन मेश्राम, सूनिल हिरापूरे,धनसिगं नैताम तसेच मोठ्या संख्येत वाहन चालक बांधव उपस्थीत होते.