Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात इंधन भरण्यासाठी लोकांची पंपावर उसळली मोठी गर्दी | Batmi Express

hit and run case,traffic jail,Chandrapur,Drivers protest,punishment in hit and run case,india news,Chandrapur Hit-And-Run Case,IPC,n,Bharatiya Nyaya

Chandrapur News,Chandrapur,hit and run case,traffic jail,India News,Drivers protest,punishment in hit and run case,Chandrapur Hit-And-Run Case,IPC,n,Bharatiya Nyaya (Second) Sanhita 2023,India,

चंद्रपूर:- 
नवीन भारतीय न्याय (द्वितीय) संहिता, 2023 अंतर्गत 'हिट-अँड-रन' प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढली आहे. याच नवीन नवीन कायद्यानुसार, वाहनचालकांना पळून जाण्यासाठी आणि प्राणघातक अपघाताची तक्रार न केल्यास 10 वर्षां पर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी, आरोपीला आयपीसीच्या कलम 304A (निष्काळजी पणामुळे मृत्यू होऊ शकतो) अंतर्गत केवळ दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होत. या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांचे आंदोलन सुरु आहे. चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येत आहे. चालकांच्या हातून अपघात घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षाचा कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा ठेवण्यात येणार आहे. नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीतून इंधन आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणारे चालकांकडून काम बंद पुकारण्याची शक्यता आहे. या संपामुळे ऑइल कंपन्याच्या प्रकल्पातून राज्यातील वेगवेगळ्या भागातील पेट्रोल पंपावर केला जाणारा पेट्रोल, डिझेलसह, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असून, संप जास्त लांबल्यास जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागेल.

Read it: चंद्रपूर मध्ये आज ड्रायव्हर्सचा रास्ता रोको आंदोलन 

इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वत्र पेट्रोल पंपावर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. आता बेमुदत संप केव्हा पर्यंत राहील या भीतीने जनतेची इंधन भरण्यासाठी पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.