तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींवर विषबाधा | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Today,

Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Crime,Gadchiroli Today,
शासकीय वसतिगृहातील मुलींवर विषबाधा

गडचिरोली
: धानोरा तालुक्यातील सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील मुलींवर विषबाधा झाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान यांनी ग्रामीण रुग्णालय धानोरा व सोडे येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहास भेट देऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली व विषबाधा झालेल्या मुलींच्या प्रकृती संदर्भात चौकशी करून विचारणा केली.

वसतिगृहात अनेक बाबींची कमतरता आहे. शुद्ध पाण्याचे आर. ओ. खराब झाले असून वसतिगृह अधीक्षकांनी मागणी केल्यावर सुद्धा दुरुस्ती किंवा नवीन आर. ओ. चा पुरवठा करण्यात आलेला नाही. पूर्णवेळ प्रशिक्षित परिचारिकाची नियुक्ती नाही. वसतिगृहात क्षमतेपेक्षा जास्त विध्यार्थी आहेत. प्रशासनाने संबंधित प्रकरनाकडे गांभीर्याने लक्ष देऊन असे प्रकार पुढे घडू नये यासाठी ठोस पावले उचलावी व तात्काळ वसतिगृहात नियमित सेवा देणारी निवासी परिचारिका व वेळोवेळी सेवा देणारे तज्ञ डॉक्टर, प्राथमिक उपचाराकरिता औषधी पुरवठा, शुद्ध पिण्याच्या पाण्याकरीता अत्याधुनिक RO लावावे व क्षमतेपेक्षा अधिक मुली असल्यामुळे नवीन इमारत सुद्धा लवकरात लवकर बनवण्यात यावी अशी मागणी डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.

 यावेळी सोबत माजी जि. प. सदस्य विनोद लेनगुरे, पत्रकार हेमंत डोरलीकर, सरपंच पुनमताई किरंगे, शेवंताबाई हलामी उपस्थित होते.


Gadchiroli: Girls in government hostel for tribal girls at Sode in Dhanora taluk were poisoned. After getting information about the incident, Maharashtra Pradesh Congress Committee General Secretary and Gadchiroli Chimur Lok Sabha Coordinator Dr. Namdev Kirsan visited rural hospital Dhanora and government hostel for tribal girls at Sode, got information about the case and inquired about the condition of the poisoned girls.

The hostel lacks many aspects. Pure water R. O. damaged and even after the hostel superintendent demanded repair or new R. O. has not been supplied. No appointment of full time trained nurse. There are more students than the capacity in the hostel. The administration should pay serious attention to the matter concerned and take concrete steps to prevent such incidents from happening again and immediately install resident nurses for regular service and expert doctors for regular service in the hostel, medical supplies for first aid, modern RO for pure drinking water and as there are more girls than the capacity, the new building should also be constructed as soon as possible. Dr. demanded that it be made soon. Done by Namdev Kirsan.

  At this time along with former district W. Members Vinod Lengure, Journalist Hemant Dorlikar, Sarpanch Punamatai Kirange, Shevantabai Halami were present.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.