Breaking! प्रियकराने गळा दाबून अन... डोक्यावर वार करून केली हत्या | Batmi Express

Gadchiroli News,murder,Gadchiroli,Gadchiroli Crime,Porla,

Gadchiroli News,murder,Gadchiroli,Gadchiroli Crime,Porla,

गडचिरोली
: तालुक्यातील पोर्ला-वडधा मार्गावर पोर्लापासून जवळपास दीड किमी अंतरावर जंगलात एका अनोळखी युवतीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. प्रियकराने गळा दाबून तसेच डोक्यावर वार करून हत्या केली असल्याचा अंदाज आहे. सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी.

पोर्ला येथे रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे. कामावर जाणाऱ्या मजुरांना युवतीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता,  पोलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. युवक व युवती हे दोघेही जंगलात गेले असावेत. युवतीचा खून करण्याचा निश्चय तरुणाने केला असावा. मात्र, ही बाब युवतीला कळू दिली नाही. घटनास्थळी गेल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला असावा. या वादादरम्यान युवकाने युवतीचा गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर दगडाने तिच्या डोक्यावर वार केला. युवती बेशुद्ध पडल्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला असण्याची शक्यता घटनास्थळावरील स्थितीवरून दिसून येते. मृत युवतीची ओळख पटविण्याचे काम गडचिरोली पोलिसांमार्फत सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.