तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

दिव्यांगाना स्वयं रोजगाराकरीता मिळणार मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल | Batmi Express

Washim,Washim News,Washim Today,Maharashtra,Maharashtra News,Maharashtra Live,Maharashtra Today,

Washim,Washim News,Washim Today,Maharashtra,Maharashtra News,Maharashtra Live,Maharashtra Today,
दिव्यांग व्यक्तींना मोफत ई-व्हेईकल शॉप

वाशिम
: दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याकरीता या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचेस्तरावरुन सुरु आहे.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.

दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना परिवार कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. योजनेचा लाभ गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांना नाव नोंदणी करण्यासाठी 3 डिसेंबर 2023 रोजी पोर्टल सुरु करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 4 जानेवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.


Washim: The government has approved this scheme to provide a green energy-powered eco-friendly mobile shop (Mobile Shop on E-Vehicle) free of cost to disabled persons to become self-reliant. Proceedings of implementation of this scheme Maharashtra Divyang Finance and Development Corporation, Marya. Starting from their level.

To promote employment generation by providing adequate facilities to persons with disabilities.

Economic and social rehabilitation of disabled persons. The objective of this scheme is to enable persons with disabilities to live with their families like normal persons. A portal has been launched on 3rd December 2023 for applicants to register their names to get the benefit of the scheme to the needy disabled persons. The link https://evevehicleform.mshfdc.co.in has been made available for requesting online application from persons with disabilities. The deadline has been given till January 4, 2024 to submit the online application to the differently abled persons through this link. However, maximum number of disabled persons should take the benefit of this scheme. This appeal has been made by the district managers of the Maharashtra State Disability Finance and Development Corporation.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.