धक्कादायक! प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या : फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह | Batmi Express

Be
0

Hollywood,Celebrity,हॉलिवूड,सेलिब्रिटी,New Delhi,New Delhi Crime,New Delhi Murder,New Delhi News,New Delhi Live,USA,USA News,

नवी दिल्ली : 
प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल मलिसा मूनी हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मलिसा हिचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत फ्रिजमध्ये मृतदेह आढळून आला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. इतकेच नाही तर शवविच्छेदन अहवालानुसार, मलिसा दोन महिन्यांची गरोदर होती. सोबतच मृत्यूपूर्वी तिच्यावर जड वस्तूने आघात करण्यात आला होता.

माहितीनुसार, मलिसा हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आले. त्या मिळालेल्या रिपोर्टनुसार, मृत्यूपूर्वी मलिसाच्या शरीरावर जड वस्तूने हल्ला करण्यात आला. सोबतच तिने अल्कोहोल आणि कोकेनचे सेवन केल्याचे उघड झाले आहे. तिच्या शरीरात याचे काही अंश सापडले आहेत.

६ सप्टेंबर रोजी मलिसा अखेरची तिच्या अपार्टमेंटमध्ये दिली होती. त्यानंतर ती कुठेही दिसली नाही. मात्र, १२ सप्टेंबर रोजी तिचा थेट मृतदेह घरात आढळून आला. मलिसाच्या मृत्यूनंतर आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. तिच्या आयक्लाऊडवर एक अर्लट मेसेज आला होता. ज्यात तिचा मोबाईल अन्य कोणी तरी वापरत असल्याचे दिसून आले. सध्या या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->