तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Kerala Blast: केरळ हादरलं ! केरळमध्ये मोठा स्फोट : एकाचा मृत्यू तर ३५ जण जखमी | Batmi Express

India,Kerala,Kerala News,केरळ,Kerala Live,Kerala Today,India,India News,

India,Kerala,Kerala News,केरळ,Kerala Live,Kerala Today,India,India News,

वृत्तसंस्था / केरळ : 
केरळमध्ये एका ख्रिश्चन मेळाव्यात मोठा स्फोट झाला आहे. स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्याच्या एर्नाकुलममधील कलामासेरी येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका सभेदरम्यान मोठा स्फोट झाला.

या स्फोटात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर २० जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

स्फोटांचा तपास NIA करणार -

केरळमधील साखळी बॉम्बस्फोटांचा तपास एनआयए (NIA) करणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए लवकरच घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात करणार आहे. एनआयएची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचणार आहे. साखळी स्फोटांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

केरळमधील स्फोटाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी फोनवर बोलून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. गृहमंत्र्यांनी एनआयएला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

घटनास्थळी बचावकार्य सुरू -

सध्या केरळ पोलिसांकडून या स्फोटाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही, मात्र एका अधिकाऱ्याने सांगितले की, सकाळी ९ वाजता स्फोट झाल्यानंतर पोलिसांना मदतीसाठी फोन येऊ लागले. तात्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिक लोकांसह मदत आणि बचावकार्य सुरू केले. स्फोटानंतर शेकडो लोक पोलिसांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्फोटानंतर भयावह दृश्य दिसत आहे.

एकापाठोपाठ ३ ते ४ ब्लास्ट -

कन्व्हेन्शन सेंटरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. स्फोट झाला तेव्हा सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. एकापाठोपाठ एक ३ ते ४ स्फोट झाले, ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

गृहमंत्री अमित शाहांनी घेतला परिस्थितीचा आढावा -

या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या स्फोटाबाबत सर्व माहिती जाणून घेतली असल्याचे सुत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे आणि जखमींना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश अमित शहांनी दिले आहेत.

केरळचे मंत्री काय म्हणाले?

केरळचे उद्योगमंत्री आणि कलामासरीचे आमदार पी. राजीव यांनी या घटनेबाबत सांगितले की, अधिकाऱ्यांना शक्य ती सर्व मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, मी सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आहे. सर्व सूचना जारी केल्या आहेत. स्फोटाच्या कारणाबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. तपास सुरू करण्यात आलेला आहे. सध्या घटनास्थळी कोणालाही जाण्याची परवानगी नाही.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.