तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: विज पडून एक ठार तर दोघे जखमी .! | Batmi Express

Mul,Mul News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Lightning Strike,Chandrapur Today,

Mul,Mul News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Lightning Strike,Chandrapur Today,

चंद्रपूर
:- शेतकाम करीत असताना वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर दोन महिला जखमी झाल्या. ही घटना मूल तालुक्यातील चिचाळा येथे शेतशिवाटात रविवारी (ता. 1) दुपाटी बाटा वाजताच्यादरम्यान घडली. मृत महिलेचे नाव चंद्रकला संजय वैरागडे (वय 45) असे आहे. आशा रवींद्र बुटांडे आणि वंदना मनोज वासेकर अशी जखमी महिलांची नावे आहेत. त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी अकरा वाजता वातावरणात अचानक बदल झाला. पावसाच्या सटीसह कडकडाट आणि गडगडाटाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तासापर्यंत वातावरणात कडकडाट सुरू होता. याच वातावरणात तालुक्यातील चिचाळा कवडपेठ मार्गावर असलेल्या चंद्रकला संजय वैरागडे यांच्या शेतात सात महिला धान पिकाच्या शेतीतील निंदा काढण्याच्या कामी होत्या. त्यापैकी शेतमालक चंद्रकला संजय वैटागडे यांच्या अंगावरच वीज पडल्याने त्यांचा जागीच शेतशिवारात मृत्यू झाला. आशा रवींद्र बुटांडे आणि वंदना मनोज वासेकर या दोन महिला जखमी झाल्या.

इतर महिलांना कोणतीही इजा पोहोचली नाही. जखमी झालेल्या महिलांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मृत महिला चंद्रकला संजय वैटागडे या अल्पभूधारक शेतकटी होत्या. या घटनेमुळे चिचाळा गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आणि जखमी महिलांच्या कुटुंबीयांना तत्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.