सावली:- सावली येथील वार्ड क्रमांक 14 येथील जय बजरंग गणेश मंडळाचे गणपती चे विसर्जन असोलामेंढा नहारात करतांना 3 जण वाहून गेले आणि त्यात 1 एक जण सापडला मात्र रुग्णालयात भरती केले असता मृत घोषित करण्यात आले.या घटनेने सावली शहरात शोककळा पसरली आहे.
ऑक्टोबर ०१, २०२३
0
सावली शहरातील सावली चा राजा, सावली चा विघ्नहर्ता व जय बजरंग युवा गणेश युवा मंडळ असे तीन सार्वजनिक गणेश चे विसर्जन दिनांक 30 ला करण्यात आले.तिन्ही गणपती सावली शहराच्या प्रमुख मार्गाने आनंदात,नाचत गाजत विसर्जन स्थळी आले.त्यापैकी राजा व विघनहर्ता हे दोन गणपती हे स्थानिक लहान तलाव मध्ये विसर्जन केले तर एक जय बजरंग बली चा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करण्यासाठी गेले.गणपती विसर्जन करतांना पाण्याच्या प्रवाहात जवळपास 5 युवक बुडाले मात्र मात्र त्यातून 2 जण निघाले मात्र चांदली येथील गुंडावार बंधू व गुरूदास दिवाकर मोहूर्ले हे वाहून गेले.
काही अंतरावर गुरू मोहूर्ले ला पकडले व त्याला ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता त्या गुरुदास मोहूर्ले ला मृत घोषित केले.तसेच गुंडावार बंधू निकेश व संदीप हे अजूनही सापडले नाही.सदर घटनास्थळी सावली पोलीस आहे.मात्र या घटनेने सावली शहर हादरून गेले असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
युवकांचा हंबरडा व वाचविण्यासाठी प्रयत्न
गणपती विसर्जन केल्यावर काही युवक बाहेर आले नाही हे दिसताच गणेश मंडळाचे युवक हळबळले आणि त्यांना शोधण्यासाठी काही युवकांनी नहरात उड्या मारल्या आणि शोध कार्य सुरू होते मात्र त्यात गुरुदास मोहूर्ले हा युवक सापडला.व गुंडावार बंधू वाहून गेले.
लहान भावासाठी मोठ्याने मारली उडी
चांदली येथील निकेश व संदीप गुंडावार हे दोघे बंधू विसर्जन साठी या ठिकाणी होते. नहारात लहान भाऊ संदीप वाहून गेल्याचे कळताच त्याला शोधण्यासाठी मोठ्या भाऊ निकेश ने वाचवण्यासाठी उडी मारली मारली मात्र पाण्याच्या प्रवाहाने दोघेही अजून सापडले नाही.सावली शहरात उसाचा रस (रसवंती)विकण्याचे काम हे करीत असतात.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.