मी तुझ्यावर प्रेम करतो, तु करते की नाही ते एका तासांत सांग असे म्हणून केला विनयभंग | Batmi Express

Wardha,Wardha Crime,wardha district,wardha jila,Wardha live,wardha news,

Wardha,Wardha Crime,wardha district,wardha jila,Wardha live,wardha news,

वर्धा : घरी एकटीच अभ्यास करीत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन आरोपीने तिचा हात पकडला. 'मी तुझ्यावर प्रेम करतो, तु करते की नाही ते एका तासांत सांग असे म्हणून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले असता, अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांनी आरोपीस तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली.

मंगेश उर्फ नानू गुणीलाल बोपचे (२८) रा. वर्धा असे आरोपीचे नाव आहे. सन २०१८ मध्ये पीडिता दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी ती घरच्या मंडळीसोबत सेलूला गेली होती. परंतु दहावीची परीक्षा असल्याने

एकटीच सायंकाळी पाच वाजता घरी आली होती. घरी एकटीच अभ्यासकरीत असताना आरोपी मंगेश हा तिच्या घरी आला आणि तिचा हात पकडून विनयभंग केला. भयभीत झालेल्या पीडितेने ही बाबा घरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक राजश्री रामटेके यांनी प्रकरणाचा तपास करुन दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दोन्ही बाजुचा युक्तिवाद ऐकून आरोपी मंगेशला तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली. शासनातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय घुडे यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून संजय चावके यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.