तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: वाघ (मादि)आढळून आली मृतावस्थेत.! | Batmi Express

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,

Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Today,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur News Live,

चंद्रपूर
:- दिनांक 2/10/2023 राजी चंद्रपुर वन विभागातील परिक्षेत्र भद्रावती, उपक्षेत्र भद्रावती, नियतक्षेत्र चिपराळा, येथील कक्ष क्र. 211 मध्ये वाघ (मादि) मृत अवस्थेत आढळुन आली . त्यावेळी सदर घटनेची माहिती वरीष्ठ वनअधिकारी यांना कळविण्यात आली. त्यानुसार वरीष्ठ वनअधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

 
घटनास्थळाची पाहणी केली असता प्राथमिक अंदाजानुसार सदर वाघ (मादि) चा मृतदेह सडक्या अवस्थेत आढळल्याने मृत्युचे नमके कारण है शवविच्छेदन अहवानंतर स्पष्ट होऊ शकेल. सदर मृत वाघ (मादि) चा मृत देह ट्रांझिट ट्रीटमेंन्ट सेंन्टर येथे नेण्यात आला असुन सदर मृत वाघ (मादि) चे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन हे मा. श्री. जितेंद्र रामगावकर मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर वनवृत चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर, मा. श्री. आदेशकुमार शेंडगे सहाय्यक वरसंरक्षक (तेंदु) चंद्रपुर वनविभाग, चंद्रपुर, श्री. एच. पी. शेंडे वपअ भद्रावती, श्री. व्हि. व्हि. शिंदे, क्षेत्र सहाय्यक भद्रावती, श्री. जे. ई. देवगडे वनरक्षक, चिपराळा, डॉ. रविकांत खोब्रागडे व डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर, त्याच प्रमाणे श्री. बंडुजी धोतरे एन.टि.सी.ए. चे प्रतिनीधी, तथा महाराष्ट्र वन्यजीव मंडळ सदस्य व इतर वनकर्मचारी यांचे उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले व वन अधिकारी यांचे उपस्थीत सदर वाघ (मादि) मृत चे अग्निदहन करण्यात आले. प्राथमिक अंदाज नुसार सदर मृत वाघ (मादि) अंदाजे सहा ते सात वर्ष वयाची असुन सदर वाघ (मादि) चे दात, नखे व मीशा शाबुत आहे. सदर प्रकरणी शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्युचे कारण स्पष्ट हाऊ शकेल. प्रकरणी वनगून्हा नोदविण्यात आला असुन पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी भद्रावती हे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.