मुंबई: हवामान विभागा दिलेल्या ताज्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळे रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात तुरळक ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर राज्यातल्या इतर भागांतही मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कुठं पडणार पाऊस ?
- रायगड
- भंडारा
- गोंदिया
- नागपूर
- राज्यातल्या इतर भागांतही मेघगर्जेनेसह मुसळधार
पाऊस कधी परतणार - हवामान विभाग म्हटले :
वायव्य भारतातून पावसाचा परतीचा प्रवास 25 सप्टेंबरपासून सुरू होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सहसा मोसमी पाऊस 17 सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघार घेतो. तर, 15 ऑक्टोबपर्यंत तो देशातून पूर्णपणे माघार घेतो. यंदा मात्र हा प्रवास काहीसा उशिराने सुरु होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.