आरमोरी :- वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्या आरमोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक महागात पडले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिका-यांनी प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र देवराव धात्रक यांना निलंबित केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आरमोरी अंतर्गत 5 सप्टेंबर रोजी आरमोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय पोषण आहार उपक्रमांतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या मोहिमेअंतर्गत सामुहिक पोषण शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात आयोजित सभेत प्रभारी मुख्याध्यापिक धात्रक यांनी माझ्या शाळेतील हॉलमध्ये सभा घ्यायची नाही, असे म्हणित एकात्मिक बाल विकास अधिका-यांशी हुज्जत घालित सभा रद्द केली. या प्रकरणी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी जिप मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार केली प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सीईओ यांनी प्रभारी मुख्याध्यापक राजेन्द्र धात्रक यांना निलंबित करीत. सिरोंचा पंचायत समिती मुख्यालयात राहण्याचे आदेश देण्यात आले
प्रकल्प अधिकाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी प्राप्त। तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. जिप मुख्य कार्यपालन अधिकारी गडचिरोली यांनी प्रभारी मुख्याध्यापकास निलंबित केले आहे.
नरेंद्र कुमार कोकोडे, गट शिक्षणाधिकारीअधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी