Taxi Rape: धावत्या टॅक्सीमध्ये युवतीवर झाला बलात्कार | Batmi Express

Crime in Mumbai,crime mumbai,latest mumbai news,live mumbai news,Mumbai,Mumbai Live,Mumbai Today,Mumbai News,today mumbai news,

Crime in Mumbai,crime mumbai,latest mumbai news,live mumbai news,Mumbai,Mumbai Live,Mumbai Today,Mumbai News,today mumbai news,

मुंबईत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धावत्या टॅक्सीत बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात तक्रार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी टॅक्सी ड्रायव्हरदेखील सामील असल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत.

18 सप्टेंबर रोजी 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे कुटुंबीयांसोबत काही कारणास्तव भांडण झाले होते. त्यानंतर ती घर सोडून निघाली होती. भांडणानंतर मालवणी परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी ती निघाली होती. नातेवाईकांकडे जाण्यासाठी ती प्रकाश पांडेच्या टॅक्सीत बसली होती. मालवणीकडे जात असताना जेव्हा टॅक्सी दादरपर्यंत पोहोचली तेव्हा ड्रायव्हरने त्याच्या ओळखीच्या सलमान नावाच्या व्यक्तीला कारमध्ये बसवले आणि मालवणीसाठी निघाले.

दादर ते सांतक्रुझ या दरम्यान सलमानने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जेव्हा मालवणीपर्यंत पोहोचले तेव्हा पीडितेला टॅक्सीतून उतरवले आणि तिथून फरार झाले. पीडितेने कसे बसे करत आपल्या नातेवाईकांचे घर गाठले आणि घडलेली सगळी घटना त्यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांसोबत संपर्क करत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके तयार केली. दोन तासांतच पोलिसांनी आरोपी सलमान आणि टॅक्सी ड्रायव्हर प्रकार पांडे या दोघांना अटक केली आहे. प्रकाशवर सलमानला मदत केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांवर बलात्कार व पॉक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीची वैद्यकिय तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.