Electric Shock: शेतात विद्युत तारेचा शॉक लागून शेतकरी पती-पत्नी जागीच ठार तर एक महिला जखमी | Batmi Express

Gondia,Gondia Live,Gondia Live News,gondia news,Arjuni,Electric Shock,Gondia Electric Shock,electrocution

Gondia,Gondia Live,Gondia Live News,gondia news,Arjuni,Electric Shock,Gondia Electric Shock,electrocution

गोंदिया (
सडक अर्जुनी.दि.20): जिल्ह्यातील घाटबोरी येथील शेत शिवारात शेतकरी दांपत्य हे आपल्या शेतात भात पिकाच्या शेतीत काम करण्यासाठी गेलं होत. काम करीत असताना अचानक शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून पती आणि पत्नी जागीच ठार तर एक जण जखमी झाली आहे. 

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ; कचरा काढण्याचे काम करत असताना हा अपघात झाला आहे. धान पिकातील कचरा काढत असताना विद्युत तारेचा शॉक (Electric Shock) लागून दोघांचा मृत्यु झाला आहे. यात पती तुळशीदास लंजे (वय ४५) व पत्नी मायाबाई लंजे (वय ४२) अशी मृतकांची नावे असुन तर इंदुबाई हिरालाल लंजे (वय ४३) असे जखमी महिलेचे नाव आहे. 

| वडसा: विज पडून 8 शेळया जागीच ठार

विजेच्या प्रवाहीत तार पडल्याने विद्युत करंट लागून शेतकरी दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एक महिला गंभीर जखमी झाली असून जखमी महिलेवर सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. मृताच्या कुटुंबीयांना विद्युत विभागाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.