कोरची येथे पत्रकार भवनासाठी जागा व निधी द्या; कोरची तालुका वाईस ऑफ मीडियाची मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli Live News,Korchi,Gadchiroli Batmya,

कोरची प्रतिनिधी (BEMR-15 KORCHI) - कोरची तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार संघ राहत आहे परंतु पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन नाही. त्यामुळे कोरची तहसील येथे आढावा बैठकीला आलेले राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना तालुका वाईस ऑफ मिडिया संघटनाकडून बुधवारला निवेदनातून पत्रकार भवनासाठी जागा व निधीसाठी मागणी केली आहे.

निवेदनात कोरची तालुका हा अतिदुर्गम अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो. येथे अनेक वर्षांपासून तालुक्यातील पत्रकार विविध समस्या शासनापुढे मांडत आहेत. कोरची येथील पत्रकार बांधवांसाठी स्वतःच व्यासपीठ म्हणून एक पत्रकार भवन इमारतीची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे जागा व निधीची मागणी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देऊन केली आहे. 

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देताना गडचिरोली व्हाईस ऑफ मिडिया संघटना जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, तालुका अध्यक्ष राहुल अंबादे, सरचिटणीस मधुकर नखाते, सदस्य राकेश मोहुर्ले  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->