दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.
Maharashtra SSC-HSC Supplementary Result | Maharashtra SSC-HSC Supplementary Result Live Soon | Maharashtra SSC-HSC Supplementary Result News | Maharashtra SSC-HSC Supplementary Exam Result Tomorrow
विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल 2023 कसा तपासायचा:
- बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.maharesult.nic.in) जा आणि होमपेजवरील इयत्ता 12वीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तुमचा रोल नंबर आणि/किंवा नोंदणी क्रमांक टाका.
- तपशील सबमिट करा आणि तुमचा निकाल तपासा.
- भविष्यातील वापरासाठी निकाल पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.