संभाजी भिडे याच्यावर कार्यवाही करा - कोरची नगरवासीयांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन | Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Korchi,Gadchiroli Batmya,

 

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Korchi,Gadchiroli Batmya,

  •  कोरची नगरवासीयांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

कोरची प्रतिनिधी :- या तालुक्यातील ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या वतीने संभाजी भिडे यांना तातडीने अटक करण्यात यावे यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 

हे देखील वाचा:

नागभिड ची कन्या शितल वामन कोसे नेट परीक्षा ऊत्तीर्ण

संभाजी भिडे अर्थात मनोहर कुलकर्णी यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या विरोधात अभद्र वक्तव्य करीत अपमान केला आहे. समाजा समाजात वाद घालण्यासाठी वक्तव्य करीत आहे. ज्या महापुरुषांनी समता आणि मानवतावादी विचार पेरून समतामुलक समाज तयार करण्यासाठी अख्खे आयुष्य खर्ची घातले आहे, अशा महापुरुषांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या मनोहर कुलकर्णी अर्थात संभाजी भिडे यांना तातडीने अटक करून त्यांचेवर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. 

हे देखील वाचा:

महापूर ओसरला...मग आरोग्याची झटपट काळजी घ्या नाहीतर.... 

निवेदन सादर करताना राकेश मोहुर्ले, अजीत मोहुर्ले, रोशन शेंडे, मनोज अग्रवाल, वासिम शेख, राजू टेंभुर्णे, चेतन कराडे, आनंद पंधरे, अविनाश हुमणे, मोसिम जाळीया, चंदू वालदे, पंजाबराव उईके, रामदास कल्लो, विजय गुरनुले, विजय चौधरी ईत्यादी नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.