चंद्रपूर: जिल्यातून चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यांना वगळण्यात यावे याकरिता काल नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव येथे जलसमाधी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला होता. काल समितीच्या वतीने जिल्हा निर्मिती साठी आंदोलणे करण्यात आली. तसेच चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून नागभीड, ब्रम्हपुरी यांनी आंदोलन केले मात्र शासनाचे लक्ष वेढाण्यासाठी आज नागभीड येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता महसूल व पोलीस प्रशासनाने आंदोलन स्थळी न जाऊ देण्याचा बंदोबस्त करण्यात आल्याने घोडाझरी प्रवेश द्धार येथे अडविण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी नागभीड- चंद्रपूर रस्ता अडवून धरत आंदोलन सुरु केले यामुळे शेकडो वाहने दोन्ही बाजूनी अडून होती. आंदोलन कर्त्यांनी चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून वागळण्यासाठी चिमूर आमदार बंटी भंगाडिया यांचा निषेध करत आंदोलन कर्तेनारे देत होते.
हे देखील वाचा:
|संभाजी भिडे याच्यावर कार्यवाही करा - कोरची नगरवासीयांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रशासन याकरिता सर्व दृष्टीने प्रयत्न करुन आंदोलन शांत ठेऊन आंदोलन कर्त्यांना वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र दिसून आले. आंदोलन तीन वाजेपर्यंत सुरु असल्याने पोलीस व महसूल विभागाने आंदोलन कर्ते व प्रशासन यांच्यात समेट घडून १० दिवसात चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून न वगळल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत तहसीलदार चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आले.
हे देखील वाचा:
|महापूर ओसरला...मग आरोग्याची झटपट काळजी घ्या नाहीतर....
यावेळी पोलीस उप विभागीय अधिकारी ठोसरे, पोलीस निरीक्षक अंभोरे, सह पोलीस निरीक्षक कोरवते, वन परीक्षेत्र अधिकारी हजारें नायब तहसीलदार कावळे, हजर होते. यावेळी चोख बंदोबस्त असल्याने जल समाधी आंदोलन घोडाझरी तलावाऐवजी घोडाझरी प्रवेशद्धार या ठिकाणी आंदोलन कर्त्याना समाधान मानावे लागले. यावेळी मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते.