भंडारा: गोसीखुर्द च्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाची हजेरी होत असल्याने गोसीखुर्द पाणी साठयात वाढ झाल्याने धरणाचे 33 पैकी 33 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले असून 1,87,320 क्युसेस पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सुरु आहे. धरणातून विसर्गात पुन्हा वाढ करण्यात येईल. सध्या गोसीखुर्द चे सर्व दरवाजे उघडले असल्याची माहिती आली. 33 दरवाज्यातून 1,87,320 क्युसेस पर्यंत पाणी विसर्ग वैनगंगा नदी पात्रात करण्यात येत आहे. आवशक्यता पडल्यास विसर्गात पुन्हा वाढ होईल - अशी शक्यता दर्शविण्यात्त येत आहे.
हे देखील वाचा:
|महापूर ओसरला...मग आरोग्याची झटपट काळजी घ्या नाहीतर....
नदी काठच्या गावांना इशारा - चंद्रपुर , गडचिरोली:
गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गात पुन्हा वाढ होईल. तरी भंडारा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. नदी काठांवर राहणारे आणि नदी पात्रातून ये जा करणाऱ्या नागरिकंनी काळजी घ्यावी, सतर्क रहावे, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.