अकोला शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील दहावीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हे देखील वाचा:
|दुचाकीने बैलबंडी ला दिली धडक, युवक ठार
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोला शहरातल्या खडकी येथे १०वीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आकाश सुदेश निकोजे असे या मुलाचे नाव असून तो आईवडील आणि बहिणीसोबत राहत होता. घरात कोणी नसल्याचे पाहून मुलाने गळफास घेवून स्वतःचे आयुष्य संपवले.
हे देखील वाचा:
|ब्रम्हपुरी: मालडोंगरी-चकबोथली रोडवर भीषण अपघात.! एक ठार तर एक जखमी
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (police) तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले असावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस या आत्महत्येचा सखोल तपास करत आहेत.