दुचाकीने बैलबंडी ला दिली धडक, युवक ठार | Batmi Express

Pombhurna,Pombhurna Accident,Pombhurna Live,Pombhurna News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur News,

Pombhurna,Pombhurna Accident,Pombhurna Live,Pombhurna News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur  News,

चंद्रपूर
: पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावाजवळील शेतात जाऊन आपले काम आटोपून करून बैलबंडीने  वेळवा माल गावाकडे परताना वेळवा कडून चेक नवेगाव मार्गे जात जाणाऱ्या दुचाकीने ( दुचाकी क्रमांक: MH34CA6839) बैल बंडीला समोरासमोर धडक दिली या धडकेत दुकाकिस्वार ठार झाला तर या अपघातात एका बैलाचा पाय मोडला आहे. सदर घटना दि.३१ जुलै सोमवारला रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. पंकज निलकंठ भोयर वय २७ रा. वेळवा असे मृतक युवकाचे नाव आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा माल गावा नजीक असलेल्या लोणी शेतशिवरातील आपल्या शेतातून शेतीचे काम आटोपून किर्मराव किन्नाके रा.वेळवा हे बैलबंडी घेऊन वेळवा माल गावाकडे जात असताना वेळवा माल कडून चेक नवेगाव कडे जाणाऱ्या दुचाकीने पंकज भोयर ने बैल बंडीला समोरासमोर जोरदार धडक दिली यात बैलाचा पाय मोडला तर पंकज गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत त्याला तत्काळ पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र डॉक्टरांने त्याला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.