गडचिरोली: वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली योगेश शेरेकर (Yogesh Sherekar) यांनी केलेल्या कथित गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी येथील वनसंरक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन अखेर शेरेकर यांना निलंबित (Suspend) करण्यात आले. वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांनी एका पत्राद्वारे ही माहिती आंदोलनकर्त्याना दिली. त्यामुळे १४ दिवसांपासून सुरू असलेले हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
ऑगस्ट २३, २०२३
0
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वनसंरक्षकांनी तीन सदस्यीय समिती आधीच गठीत केली आहे. परंतू चौकशी निष्पन्न होण्यासाठी शेरेकर यांना आधी निलंबित करा, अशी मागणी सरपंच परिषदेचे योगाजी कुडवे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे यांनी केली होती. दरम्यान खुणे यांनी या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतर खासदार अशोक नेते यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन योग्य दखल घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी शेरेकर यांना निलंबित करून चौकशी करत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान शेवटच्या दिवशी या आंदोलकांनी अर्धनग्न आंदोलन करून लक्ष वेधले. यावेळी योगाजी कुडवे, प्रणय खुणे यांच्यासह रविंद्र सेलोटे, निळकंठ संदोकर, चंद्रशेखर सिडाम, आकाश मट्टामी, शंकर ढोलगे, विलास भानारकर, कलम शहा आदी उपस्थित होते.
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.