अर्जुनी मोरगांव तालुक्यातील सहकारी संस्था यांच्या जिल्हासंघा कडुन विविध समस्यांवर चर्चा | Batmi Express

अर्जुनी मोरगांव तालुक्यातिल कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था यांच्या जिल्हासंघा कडुन संस्थाच्या विविध समस्यावर चर्चा

Gondia,Arjuni,Gondia Live,gondia news,

आज दिनांक 20/08/2023 ला अर्जुनी मोरगांव तालुक्यातिल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था यांच्या जिल्हासंघा कडुन संस्थाच्या विविध समस्यावर चर्चा करण्यात आली त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी संस्थाच्या तालुका संघाची आवश्यकता भासत असल्याने विविध सेवा सहकारी संस्था संघ जिलाध्यक्ष श्री डोमाजी बोपचे, श्री योगेशजी हरिनखेडे कोषाध्यक्ष जिल्हासंघ, सहकार मित्र उमेशजी गौतम यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.

त्यामध्ये तालुक्यातिल सर्व संस्था अध्यक्षानीं भाग घेतला, तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली, त्यात एकमतानी अध्यक्ष पदि श्री, ललित कुमार वासुदेवजी बाळबुध्दे यांची नियुक्ति करण्यात आली, उपाध्यक्ष पदि श्री, सुभाष गणपतजी देशमुख तर सचिव पदी श्री, अरुण वासुदेवजी गजापुरे यांची निवड करण्यात आली आणि तालुका कमेटी तयार करण्यात आली, जिल्हा कमेटी चे स्वागत चामेश्वरजी गहाणे,अण्णांजी पाटिल डोंगरवार ,रत्नाकरजी बोरकर यांनी केले असुन संचालन शंकरजी लोगडे यांनी केले,आजच्या कार्याचे आभारप्रदर्शन  प्रदिप भाऊ मस्के यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.