तलाठी परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू | Batmi Express

Be
0
Bhandara,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Today,Bhandara Live,Talathi Bharti,Talathi Bharti  2023,

भंडारा : जिल्हयात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान तीन सत्रात तलाठी परिक्षा जिल्ह्यातील उपकेंद्रावर घेण्यात येत आहे. जिल्हयातील सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडतील व तेथील परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे शक्य होईल अशी व्यवस्था करावी,म्हणून सदर परीक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरापर्यत फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम १४४ अन्वये मनाई हुकुम जारी करणे हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आवश्यक झाले.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये परीक्षा सुरळीतपणे व पारदर्शकपणे पार पाण्याच्या दृष्टीने या परीक्षा केंद्रांच्या परिसरात २०० मीटर अंतरावरील पुढील बाबी कृत्य करण्यास मनाई आदेश जारी केले आहे.

या २०० मीटर निषिध्द क्षेत्रात झेरॉक्स मशीन व फॅक्स तसेच एस.टी.डी.बुथ परीक्षा कालावधीत सुरु राहणार नाही.परीक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल, फोन लॅपटॅाप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा इत्यादीचा वापर करता येणार नाही. निषिध्द क्षेत्रात नारेबाजी करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषणे करणे, घोषणा करता येणार नाही. तसेच पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाही.यांची संबंधितानी नोंद घ्यावी,असे जिल्हादांधिकारी यांनी कळविले आहे.

पोलिस अधिक्षक, भंडारा यांनी आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निमार्ण होणार नाही.या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक पोलिस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी.

सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द फौजदारी नियमातंर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल.असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->