भद्रावती शहरात आढळले नवजात मृत अर्भक | Batmi Express

आज मंगळवारी भद्रावती शहरात सकाळच्या सुमारास पुरुष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली.
Bhandara,Bhandara News,Bhandara Crime,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Marathi News,Chandrapur News IN Marathi,
ही फोटो केवळ बातमी दर्शवीत आहे. - वरील फोटो चंद्रपुर जिल्ह्यातील मृत अर्भकाची आहे. 

भद्रावती - दि:22 ऑगस्ट :- शहरातील जंगल नाका परिसरात मुख्य रस्त्यावरील डिव्हायडर मध्ये आज मंगळवारी सकाळच्या सुमारास पुरुष जातीचे मृत अर्भक आढळल्याने शहरात खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती कळताच भद्रावती पोलिसांना तात्काळ त्यांनी घटनास्थळी जाऊन  आवश्यक ती कारवाई करीत पंचनामा केला व मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास शहरातील जंगल नाका परिसर, एचडीएफसी बँके जवळच्या परिसरात एका कुत्र्याने हे मृत अर्भक तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला असता कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला.

शहरात नवजात अर्भक सापडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरताच एकच खळबळ उडाली. नवजात अर्भक सापडण्याची ही तिसरी घटना असून याआधी चंडिका मंदिराजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते. त्याअगोदर नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.