उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित | Batmi Express

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित - तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन किरण मोरे यांनी केले आहे.

Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News,Chandrapur Today,

चंद्रपूर 
: उपप्रादेशिक  परिवहन  कार्यालयातर्फे  चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प योजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पू र्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत.  तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

लायसन्स कॅम्प आयोजित शिबिराची स्थळे:


दि. 25 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 28 ऑगस्ट रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर30 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर तर 31 ऑगस्ट रोजी  शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.