Suicide: तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या | Batmi Express

Gadchiroli Live News,Gadchiroli,Bhandara,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,

Gadchiroli  Live News,Gadchiroli,Bhandara,Armori Suicide,Gadchiroli Suicide,Armori,Gadchiroli Batmya,Armori News,

गडचिरोली
: जिल्ह्यात सर्वत्र धान रोवणीचा हंगाम सुरु आहे. बावणे यांच्या शेतात धान लावणे सुरु असताना घरी चहा बनवायला गेलं पण शेतात परतलाच नाही. मिथुन याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना अमिर्झा नजीकच्या चांभार्डा येथे 27 जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. गळफास घेतलेल्या युवकाचे नाव मिथून काशिनाथ बावणे (28) रा. चांभार्डा असे  आहे.

मागील काही दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आणि सर्वत्र धान रोवणीचा हंगाम सुरु झालं आहे. बावणे याच्या शेतातही धान रोवणीचे काम सुरु होते. दरम्यान 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास मिथुन हा घरी चहा बनविण्यासाठी घरी गेला पण तो अर्धा तास लोटूनही परत न आल्याने वडील काशिनाथ बावणे हे त्याला बघायला घरी आले. घरामध्ये त्यांनी पाहिले असता मिथुन हा गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. लागलीच त्यांनी आरडा ओरड केली असता परिसरातील नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती तात्काळ आरमोरी पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदननासाठी ताब्यात घेतला. मिथुन ने गळफास का घेतला असावं त्या मागचं कारण मात्र कळू शकले नाही. त्याच्या अशा मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.