नागपूर : कला कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्विस यांच्या संयुक्त विद्यमाने २६ व २७ जुलै रोजी दोन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने इच्छूक उमेदवारांनी सहभागी व्हावे व मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त तसेच नॅशनल करिअर सर्विस यांनी केले आहे.
ट्रेनी अप्रेंटीशीप, प्रोडक्शन असोसिएट, टेक्निशियन ट्रेनी, स्टोअर कीपर, टेली कॉलर अशा एकूण १०९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
इच्छूक उमेदवारांनी स्वतःची सर्व शैक्षणिक कागदपत्रे, रिझ्युम, आधार कार्ड, फोटोकॉपीसह जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत क्रमांक २ माळा, नागपूर येथे सकाळी १० ते ५.३० या कालावधीत उपस्थित राहावे.